शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी ठाकरेंची शिवसेना तहसिलवर धडकणार
एकत्रित होण्यासाठी आमदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
वणी:- अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मंत्रांचा ताफा अडवून सवाल उपस्थित करणाऱ्या शिवसैनिकांना अजामीनपात्र गुन्ह्यात अडकविणारे सरकार व शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी, ७ ऑक्टोबर मंगळवारी सकाळी ११ वाजता सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय परिसरात येण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले आहे. Thackeray's Shiv Sena will attack the tehsil for the justice rights of farmers
आवाहन-
वणी शहरात शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसैनिक रस्त्यावर...!
अतिवृष्टीने बळीराजा उध्वस्त झाला, पण सरकार मूक आहे! शेतकऱ्यांचा आवाज ऐकण्याऐवजी मंत्री अशोक उईके गाडीतून उतरायलाही तयार नाहीत सत्ता डोक्यात गेली की माणुसकी संपते !
या हुकूमशाही सरकारने १३ शेतकरी समर्थक शिवसैनिकांना अजामीनपात्र गुन्ह्यांत अटक करुन आतमध्ये डांबले आहे! महाराष्ट्रात आजपर्यंत असा अन्याय कधीच पाहायला मिळाला नाही! शेतकऱ्याच्या बाजूने बोलणं जर गुन्हा असेल - तर हे सरकार शेतकरीविरोधी आणि दडपशाही करणारी सत्ता आहे!
आज दिनांक ७ ऑक्टोबर ला सकाळी ११ वाजता, तहसील कार्यालय वणी येथे सर्व शेतकरी बांधवांनी हजर राहावे !
मागण्या:-
ही लढाई बळीराजाच्या न्यायाची आहे, आणि हा आवाज कुणीही दाबू शकत नाही.
संजय नि. देरकर
आमदार वणी विधानसभा, (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), संपर्क प्रमुख चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ

