-->

शासन प्रशासना विरुद्ध खासदार आमदारांचा तीव्र संताप

0

 शासन प्रशासना विरुद्ध खासदार आमदारांचा तीव्र संताप

शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शिवसैनिकांवर लादले खोटे गुन्हे

वणी:-  अतिवृष्टीमुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सोमवारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वाहनाचा ताफा अडवून प्रश्न उपस्थित करणाऱ्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.  इतकेच नव्हे तर त्यांना जामीन मंजूर सुद्धा झाला नाही. एकीकडे शेतकरी अस्मानी संकटात असतांना शेतकरी विरोधी सरकार आणि त्यांच्या दिमतीला असलेल्या प्रशासना विरुद्ध मंगळवारी निघालेल्या शेतकरी मोर्चात खासदारसंजय देशमुख, आमदार संजय देरकरांनी तीव्र संताप व्यक्त करीत सरकार व प्रशासनाला गर्भित इशाराही दिला आहे.  या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, शिवसैनिक सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक बघायला मिळाली. MPs and MLAs express intense anger against government administration।

शासन प्रशासना विरुद्ध खासदार आमदारांचा तीव्र संताप


     अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन,फळबागा पुरत्या उध्वस्त झाल्या आहे.  मात्र सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी केवळ शब्दांचा खेळ करीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची जणू थट्टाच करीत आहे.  विविध प्रकारे कर्ज काढून शेतात पीक उभे केले परंतु अतिवृष्टीमुळे ते सुद्धा हिरावून घेतले.  एकीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे सरकारचे वेळकाढू धोरण यात बळीराजा पुरता अडकला आहे. असे असतांना सरकार नियम, अटी, निकष यातच खेळ करीत आहे.  सर्वदूर अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला तरी असंवेदनशील सरकारने दिलेला शब्द फिरवला.  'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा,कोरा करू' अशा घोषणा देणारे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहे.  एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुल्तानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाचे रणशिंग फुंकत ओला दुष्काळ जाहीर करा,सरसकट कर्जमाफी करा, शेतमालाला योग्य हमी भाव द्या. अशा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मागण्या घेऊन मंगळवारी मोर्चा काढला होता.

आमदार खासदारांचा शासन प्रशासनावर संताप

    राज्याच्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना बेहाल झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात त्यांची गाडी अडवून प्रश्न विचारणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखासह शिवसैनिकांवर  सरकारच्या दबावाखाली प्रश्नाने खोटे गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली.  सोबतच शासनाने शेतकऱ्यांची थट्टाच करीत आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी केली नाही.  याविरुद्ध दंड थोपटत खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर, जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आदींनी मोर्चाला संबोधित करीत शासनाच्या दडपशाहीचा चांगलाच समाचार घेतला.  खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर, प्रवीण शिंदे चांगलेच संतापले होते.  प्रसंगी या साऱ्या दडपशाहीचे शासन प्रशासनाला परिणाम भोगावे लागणार असा इशाराही दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top