मनसे नेते राजू उंबरकरांना मातृशोक
सुनंदाबाई उंबरकर यांचे निधन
वणी / :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा मधुकरराव उंबरकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने उंबरकर परिवारासह वणी शहरात शोककळा पसरली आहे. MNS leader Raju Umbarkar mourns his mother's death
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा उंबरकर यांचे गुरुवारी दुपारी बारा वाजता चे सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. स्व. सुनंदाबाई उंबरकर ह्या राजू उंबरकर यांच्या प्रेरणास्त्रोत आणि बळाचा आधार होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व साधेपणा, आपुलकी आणि समाजभावनेने परिपूर्ण होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वणीतील राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा आपुलकीचा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा आपुलकीचा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

