-->

अनैतिक संबंधातूनच घडला मनोज च्या रक्तरंजित खुनाचा थरार

0

 अनैतिक संबंधातूनच घडला मनोज च्या रक्तरंजित खुनाचा थरार

पत्नीच्या प्रियकरासोबत दारू पिणे पडले महागात


वणी / :-  पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जीएस ऑइल मिलच्या आवारातील पाण्याच्या टाकीत नवीन वागदरा येथील मनोज वानखेडे या ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवीत या घटनेचा उलगडा करून दोघांना अटक केली आहे. The thrill of Manoj's bloody murder was caused by an immoral relationship.


     

अनैतिक संबंधातूनच घडला मनोज च्या रक्तरंजित खुनाचा थरार

शहरालगत असलेल्या नवीन वागदरा येथील रंग रंगोटीचे काम करणारा मनोज वानखेडे पत्नी व दोन मुलासह सुखाने जीवन जगत होता.  पण काही महिन्यांपूर्वी मनोज ला पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली.  त्याने पत्नीला समजावून सांगत तिचा मोमीनपुरा भागात राहणारा प्रियकर वाजीद हुसेन,३९ यांचेशी संबंध तोडून टाकण्यास सांगितले.    त्यानंतर वाजीद आणखीच भडकला.  त्याने मनोज च्या पत्नीला व्हिडीओ असल्याचे सांगत ब्लॅकमेल सारखे प्रकार करू लागला.  शेवटी वाजीद च्या या वागण्याने दोघेही त्रस्त झाले होते.  अखेर मनोज च्या पत्नीने वाजीद विरुद्ध वणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.  त्यानंतर पोलिसांनी वाजीद विरुद्ध कारवाई करून त्याला तुरुंगात पाठवले होते.  


वाजीद च्या मनात माजला होता काहूर

     मनोज ने त्याच्या पत्नीशी असलेले संबंध तोडून टाकण्यासाठी वाजीद ला तुरुंगात जावे लागले. ही खंत वाजीद च्या मनात सारखी खदखदत होती.  त्याच्या अनैतिक संबंधात अडसर ठरलेला मनोज चा काटा काढण्याची योजना तो आखत होता.  आणि अखेर वाजीद ने योजना आखली व मनोज वानखेडे ला यमसदनी पाठविले.


असा घडला मनोज च्या रक्तरंजित खुनाचा थरार


     वाजीत तुरुंगातून सुटून आल्यानंतर मनोज व पत्नीच्या संपर्कात होता.  १४ ऑक्टोबर मंगळवारी वाजीद ने मनोज ला साईनगरी परिसरात दारू पिण्यासाठी रात्रीचे सुमारास बोलावले.  त्यानुसार मनोज त्याठिकाणी आला. वाजीद ने दारूचा ग्लास भरला मनोज घोट घेत असतानाच क्षणात मागून वाजीद व त्याच्या साथीदारांनी मनोज च्या डोक्यात लोखंडी रॉड चा प्रहार केला.  अन क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला.  मनोज जमिनीवर पडताच क्षणी त्याच्यावर चाकूने सपासप वार करून हत्या केली.
मृतदेहाची लावली कार मधून विल्हेवाट
     रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेल्या मनोज चा मृतदेह वाजीद व त्याच्या साथीदारांनी कार मध्ये टाकून भालर मार्गावरील बंद अवस्थेत असलेल्या जीएस ऑइल मिलच्या आवारात असलेल्या खोल असलेल्या टाक्यात टाकून तेथून पळ काढला.सदर कार होलसेल फळ विक्रेत्याची असल्याची माहिती आहे.


पोलिसांच्या तपासात लागला खुनाच्या आरोपींचा छडा

     

१५ ऑक्टोबर ला दुपारी बारा वाजताचे सुमारास जीएस ऑइल मिलच्या आवारातील उघड्या असलेल्या टाक्यात मृतदेह असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून वेगाने तपास चक्रे फिरविली.  मृतदेहाची ओळख पाठविली आणि तपास कार्याला सुरुवात करून मनोज च्या पत्नीचा जबाब नोंदविला.  त्यातूनच हत्येचा उलगडा झाला.


पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी


     उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, प्रभारी ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी आणि सहकारी पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत प्राथमिक तपासात संशयितांना ताब्यात घेऊन हत्येचा क्षणात उलगडा केला.  या तपासात केंद्रबिंदू होती मनोज ची पत्नी.  त्यांच्या अनैतिक संबंधाचा धागा पकडून या खळबळजनक घटनेचा छडा लागला.


आरोपीनेच रचला बनाव

     मनोज ची हत्या करून वाजीद ने थेट मनोज चे घर गाठले. आणि त्याच्या पत्नीला मनोज बाबत विचारपूस केली.  जेणेकरून संशय येणार नाही. मात्र मनोज च्या पत्नीचे व वाजीद चे अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पोलिसांना आल्याने थेट वाजीद व त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.


आरोपीने दिली हत्येची कबुली

     संशयित म्हणून चौकशीसाठी वाजीद हुसेन व त्याचा साथीदार शुभम कशेट्टीवार हे पोपटासारखे बोलायला लागले अन मनोज ची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.  लगेच पोलिसांनी दोघांना अटक केली. आणि इतर साथीदार अद्याप फरार आहेत.  पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. Wani yavatmal police
     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top