अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या
शिवसेना ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
वणी:- अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्यातओला दुष्काळ, कर्जमाफी व हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान तात्काळ देण्याची मागणी करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. Provide immediate assistance to farmers affected by heavy rains
शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात त्याला मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी काही उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली आहे.
मागण्या :-
1. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये अनुदान देणे.
2. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे.
3. ओला दुष्काळ तातडीने घोषित करून पुनर्वसन उपाययोजना सुरू करणे.
या मागण्यांचा उद्देश शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणणे, पिकांचे नुकसान भरून काढणे आणि त्यांना पुन्हा हळूहळू सक्षम बनवणे हा आहे. राज्य शासनाने या विषयावर त्वरीत निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारने योग्य आणि तत्पर प्रतिसाद देणे अत्यंत आवश्यक आहे. अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील शेतकरी आपल्या कष्टाने आणि मेहनतीने जीवन जगत आहेत, त्यांना वेळेवर मदत मिळणे हे केवळ शेतकऱ्यांच्या हिताचेच नाही तर राज्याच्या कृषी विकासासाठीही अत्यंत महत्वाचे आहे.
निवेदनाद्वारे मांडलेल्या मागण्यांचा विचार करून शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत आणि कर्जमाफीसह अन्य आवश्यक सुविधा पुरवल्या जाव्यात, ही सर्वांची मागणी आहे. शेतकरी संकटग्रस्त असून राज्य शासनाने तातडीने उपाययोजना केल्यास त्यांचे जीवन सुरळीत होईल, शेतीच्या नुकसानाची भरपाई होईल आणि पुढील हंगामात शेतकऱ्यांची शेती योग्य प्रकारे सुरू राहील.
निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक
उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, विधानसभा प्रमुख सुनिल कातकडे ,दिलीप काकडे, टिकाराम खाडे,प्रकाश कऱ्हाड, विलास बोबडे, सुरेश शेंडे, अजय चन्ने, विजय ठाकरे, विलास कालेकर, तुळशीराम बोबडे, मधुकर भोगेकर, सुधाकर उपरे, सतिष भटघरे यांच्यासह महिला आघाडीतून जिल्हाप्रमुख सन्माननीय योगिता मोहोड, किरण देरकर, सुनंदा गुहे, तालुका प्रमुख सुरेखा ढेंगळे, तालुका सचिव पौर्णीमा राजुरकर, वैशाली देठे, सारिका थेरे आणि शुभांगी टोंगे उपस्थित होत्या.
तसेच वणी तालुक्यातील समस्त शिवसेना पदाधिकारी महिला सेना आघाडी,युवासेना,युवती सेना व मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

