-->

जीआरएन कंपनीत शिवसेना प्रणीत कामगार सेनेची स्थापना

0

 जीआरएन कंपनीत शिवसेना प्रणीत कामगार सेनेची स्थापना


शेकडो कामगारांनी घेतला कामगार सेनेत प्रवेश 


आ. संजय देरकर यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेची (उ.बा.ठा.) घोडदौड सुरूच



वणी/ Sangini News:- निलजई-बेलोरा-तरोडा परिसरात कार्यरत जीआरएन कंपनीत शिवसेना (उबाठा) प्रणीत कामगार सेनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.  गुरुवारी दिनांक २३ ऑक्टोबर रोजी आ. संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय निखाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रमेश भादीकर यांची अध्यक्ष तर संजय जांभुळकर यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. जीआरएन ही परिसरातील नामांकित कंपनी असून या कंपनीत चालक, हेल्पर, मजूर, सुपरवायझर असे सुमारे हजार पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत.  परिणामी कामगार सेनेच्या कार्यकारिणीमुळे परिसरातील कामगार चळवळीला बळकटी मिळाली आहे. Shiv Sena-led Kamgar Sena formed in GRN company

जीआरएन कंपनीत शिवसेना प्रणीत कामगार सेनेची स्थापना


     

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची घोडदौड सुरूच आहे.   आ. संजय देरकर यांच्या नेतृत्त्वात सध्या सर्व सेलच्या संघटनात्मक मजबुतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.  याचाच एक भाग म्हणून जीआरएन कंपनीत कामगारांची मोट कामगार सेनेच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे.  कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून संदीप ढोके, कोषाध्यक्ष युगल घिमे, सहसचिव पदी सूरज सातनकर व राजू भोगेकर तर संघटक म्हणून महेंद्र राखुंडे यांची नियुक्ती करण्यात आली.  प्रसंगी कार्यकारिणी फलकाचे देखील अनावरण करण्यात आले.  यावेळी उद्घाटक म्हणून आ. संजय देरकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. 


एकत्र येऊन लढा देऊ!

 कामगार कंपनीसाठी राबराब राबतो. मात्र त्याचा योग्य तो मोबदला त्याला मिळत नाही. कामासाठी सुरक्षीत वातावरण नसते. सुरक्षेचा अभाव असल्याने अनेक अपघात होतात. कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही. आरोग्य सेवा मिळत नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे कामगारांचे संघटन होय. या समस्या सोडवण्यासाठी सर्व कामगारांना एकत्र यावे लागेल. एकत्र येऊन लढा द्यावा लागेल. 

  संजय देरकर, आमदार शिवसेना (उ.बा.ठा)


कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय निखाडे यांनी परिसरातील कामगारांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. तर संतोष कुचनकर यांनी शिवसेना नेहमी कामगारांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरेल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाला शरद ठाकरे, लुकेश्वर बोबडे, टिकाराम खाडे, आयुष ठाकरे, दिवाकर भोंगळे तर कंपनीतील अनिल जांभुळकर, नितीन पखाले, उमेश्वर पाचभाई, राकेश घिमे, शंकर कोटनाके, संकेत भादीकर,  मोरेश्वर पाचभाई, सूरज निब्रड, भारत खाडे, ओमप्रकाश सोनटक्के, चंदू बोर्डे, सुफेमयन कांबळे, महेंद्र बावने, रोशन सोनटक्के, नितीन भादीकर, दिलीप नवले, नितीन तुराणकर यासह शेकडोंची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top