-->

प्रभाग चार मध्ये उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

0

 प्रभाग चार मध्ये उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला


प्रचार मोहिमेला नेत्यांची उपस्थिती


वणी/:-  नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला शहरात सुरुवात झाली आहे.  सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.  शहरातील प्रभाग चार मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी गुरुवारी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे. Candidate campaigning in full swing in Ward 4

प्रभाग चार मध्ये उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला
प्रभाग चार मध्ये उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला


     नगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.  शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ संचिता विजय नगराळे, नगरसेवक पदाचे उमेदवार प्रवीण ढोके, मेघा सुधीर पेटकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसंवेत स्थानिक जिल्हा परिषद कॉलनीतील हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे.

      महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विद्यमान आमदार संजय देरकर, मनसे नेते राजू उंबरकर व घटक पक्षातील नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे.  
     शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा दमदार उमेदवार डॉ संचिता नगराळे, सोबतच त्यांचे रुग्णालय आणि त्यांच्या पतीचे जनतेत असलेले निकटचे संबंध सोबत महाविकास आघाडीतील पक्षाचा प्रभाव व कार्यकर्ते , पदाधिकारी यांच्या जोरावर ही निवडणूक लढवीत असल्याचे बोलल्या जात आहे.  अन सोबतीला प्रभाग चार मधील मागील काळात जलपूर्ती सभापती, बांधकाम सभापती पद पालिकेत भूषविणारा उमेदवार प्रवीण ढोके, अन जनमानसात वावरणारा सुधीर पेटकर यांची पत्नी मेघा पेटकर यांच्या कामाची जोड असल्याने प्रभाग चार मध्ये महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचे दिसते आहे.    

     प्रभाग चार मध्ये गुरुवारी प्रचाराचा शुभारंभ करीत महाविकास आघाडीच्या ठाकरे पक्षातील अधिकृत उमेदवारांनी घराघरात भेट देत प्रचाराला सुरुवात केली आहे.  आता खऱ्या अर्थाने नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असल्याचे दिसायला लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top