-->

हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू

0

 हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू


लालपुलिया परिसरातील हृदयद्रावक घटना


वणी/:-  पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरातील दुचाकीमध्ये पेट्रोल भरून येणाऱ्या ४२ वर्षीय महिलेला सुसाट येणाऱ्या हायवाने धडक दिली.  यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १९ नोव्हेंबर बुधवार दुपारी चार वाजताचे सुमारास घडली आहे. Woman on bike dies on the spot after being hit by a truck।

हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू
हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू


     शहरालगत असलेल्या चिखलगाव परिसरातील लालपुलिया भागात राहणारी नाजमीम मकसूद शेख ही महिला लगतच असलेल्या यवतमाळ मार्गावरील पेट्रोल पंपावर मोपेड मध्ये पेट्रोल भरून निघाली.  अन घराकडे वळण घेत असताना भरधाव येणारा हायवा क्रमांक सीजी ०४ एमएम १९०३ ने जबर धडक दिली.  या धडकेत महिलेचा मृत्यू झाला.  तिला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.  तिच्या पश्चात पती,दोन मुली व एक मुलगा आहे.  या अपघाती निधनाने चिमुकले मात्र आईविना पोरके झाले आहेत.  पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top