प्रभाग चार मध्ये मविआ ची दोघांना उमेदवारी?
एक लढणार की, दोघेही?
वणी/:- नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना(ठाकरे) मनसे व घटक पक्षांनी आघाडी करीत जागावाटप केले. मात्र प्रभाग चार मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाने व काँग्रेस पक्षाने वेगवेगळे उमेदवार दिल्याने दोघेही लढणार की, यातील एक उमेदवार लढणार? हा प्रश्न कायम आहे. Mavia has nominated two candidates in Ward Four.
प्रभाग चार मध्ये मविआ ची दोघांना उमेदवारी
वणी नगर परिषद निवडणुकीचा ज्वर चांगलाच तापला आहे. एकीकडे महायुतीतील शिंदे सेना व भाजप वेगवेगळे लढत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस,शिवसेना ठाकरे, मनसे घटक पक्ष आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.
या आघाडीतील प्रमुख नेत्यांनी बैठका घेऊन आपापले उमेदवार दिले आहे. परंतु प्रभाग चार मध्ये वेगळेच चित्र बघायला मिळाले. या प्रभागात शिवसेनेने प्रवीण ढोके यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने धीरज भोयर यांना नामनिर्देशित केले आहे. परिणामी या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होणार की, यातील एक माघार घेणार हे सध्यातरी अस्पष्ट आहे. एकीकडे आघाडी अन दुसरीकडे परस्पर उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी होणार की, मैत्रीपूर्ण लढणार? हे सध्यातरी कोडेच आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडणूक लढण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. एकही माघार घेणार नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. परिणामी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता बळावली आहे.
