एका शिक्षकाकडे मतदारयादी व दोन शाळांचा प्रभार
वणी पंचायत समितीचा अजब कारभार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
वणी:-/ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकावर स्थानिक शाळेसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठी चा प्रभार लादला आहे. सोबतच बेसा येथील शिक्षकाकडे भालर वसाहतीच्या मतदार यादी तयार करण्याचे काम सुद्धा असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविणार केव्हा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकूणच दोन शाळेतील आर्थिक व्यवहार अन मतदार यादीचे काम एका शिक्षकाकडे देण्याचा अजब कारभार पंचायत समिती शिक्षण विभागाने केल्याचे दिसून येत आहे. One teacher has the voter list and the charge of two schools
![]() |
| एका शिक्षकाकडे मतदारयादी व दोन शाळांचा प्रभार |
अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान!
वणी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे हित न जोपासता बेसा शाळेतील शिक्षकाकडे दोन शाळातील प्रशासकीय व आर्थिक व्यवहार हस्तांतरित करण्याचे पत्र दिले आहे. सोबतच मतदारयादी तयार करण्याचे काम याच शिक्षकाकडे आहे. या अतिरिक्त कामामुळे बेसा शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे अगदीच स्पष्ट आहे. One teacher has the voter list and the charge of two schools
सदर आदेश की, कुरघोडी?
पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठी येथील शाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून एकाची नियुक्ती केली आहे. याचं शाळेत एक शिक्षिका असतांना बेसा येथील शाळेतील शिक्षकाकडे लाठी येथील शाळेतील प्रशासकीय व आर्थिक व्यवहार हस्तांतरित करण्याचे पत्र दिले आहे. यावरून सदर आदेश की,कुरघोडी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्र शाळेतून शिक्षक देण्याऐवजी एक शिक्षक असलेल्या शाळेतील शिक्षकावर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला असल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे.

