-->

लोकशाही वाचवण्यासाठी ठाकरे बंधू व मविआ मैदानात.

0

 लोकशाही वाचवण्यासाठी ठाकरे बंधू व मविआ मैदानात.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे आयोगाला सडेतोड प्रश्न.


वणी:-/  आज मुंबईत सुरू असलेल्या मोर्चात मविआ व मनसे प्रमुखांनी निवडणूक आयोगाची चांगलीच पोलखोल करीत सत्याचा विजय मोर्चात संबोधित करतांना निवडणूक आयोगाची पुराव्यासह पोलखोल केली.  मात्र याचे प्रत्युत्तर म्हणून भाजपने सुद्धा मोर्चा काढला. परंतु लोकशाहीचे पाईक असतांना आयोगाची बाजू घेणारे सत्ताधारी यांचा चेहरा यानिमित्ताने उघडा पडला. Thackeray brothers and M.V.A. are on the field to save democracy.

लोकशाही वाचवण्यासाठी ठाकरे बंधू व मविआ मैदानात.
लोकशाही वाचवण्यासाठी ठाकरे बंधू व मविआ मैदानात.


     आज १ नोव्हेंबर ला मुंबईत "सत्याचा मोर्चा" म्हणून मविआ व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चा काढत मुंबई पुरती जॅम करत आयोगाचीपोलखोल केली.   तर दुसऱ्या बाजूला लोकशाहीला मदत करण्याऐवजी जनतेची दिशाभूल करण्याआधी भाजपने प्रतिमोर्चा काढला.  वास्तविकराज्यात नव्हे,तर  देशात मतचोरी कशी होते. हे राज ठाकरेंनी पुराव्यासह सादरीकरण केले.  मग निवडणूक आयोगाने उत्तर देण्याऐवजी भाजपचे लोक पुढे येऊन उत्त7देत आहेत. यावरूनच देशात,राज्यात मतचोरी करून सरकार आले असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.  परिणामी जोवर खऱ्या मतदारांची यादी येणार नाही तोवर निवडणुका होऊ देणार नाही. असा सज्जड दम ही दिला आहे.


     राज ठाकरे गरजले....

सत्याचा मोर्चा आज मुंबईत काढण्यात आला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांचेसह मनसेचे नेते लाखो जनतेसह सहभागी झाले होते.  मोर्चाला संबोधित करतांना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची यथोचित पोलखोल करत हे सरकार चोरीचे आहे.  जनतेचा हक्क हिरावून घेणारे आयोग अन,सरकार यांना धडा शिकविण्यासाठी हा मोर्चा आहे.  जर मानले नाहीत तर महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका असा दम ही भाषणातून भरला आहे.  आता पुढे जनता ठरवेल अन आम्ही सोबत. पण जर मतचोरी करत असेल तर बडवा. पूर्ण दुबार यादी वाचूनच दाखविली.  राज्यात लाखोंच्या संख्येने बोगस मतदार असल्याचा जणू पुरावाच सादर केला.

सत्ताधारी पक्षासह सर्वांना मतदारयादी विषयी तक्रार आहे तर निवडणुकांची घाई कुणासाठी? कल्याण, मुरबाडचे साडेचार हजार मतदार तिकडेही मतदान करतात आणि मलबार हिलमध्ये ही मतदान करतात.

असे महाराष्ट्रात लाखो लोकं असतील. हा फार मोठा विषय नाही, साधी गोष्ट आहे, मतदारयादी साफ करून पारदर्शक करा आणि त्यानंतरच निवडणूक घ्या.

EVM मध्ये गडबड असल्याचं मी २०१७ पासून सांगतोय. २३० जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता, कारण विधानसभेला निवडून येणाऱ्यांची सोय आधीच झाली होती.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७,२९,४५६ पैकी ६२,३७० दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभेत १७,१२,२४२ पैकी १,०२,००२ दुबार मतदार आहेत. हीच परिस्थिती राज्यातल्या इतर सर्व मतदारसंघात आहे. त्याचे आज मी पुरावे घेऊन आलो आहे.


गेली पाच वर्षे निवडणूक घेतलेली नसताना मतदारयादी दुरुस्तीसाठी अजून काही दिवस गेले तर असं काय नुकसान होणार आहे? पण जी माणसं मतदारयादीत घुसवली आहेत त्यांचं काय?

मतदार यादीतील अशा प्रकारचे घोळ ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचली आहे.

जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा दुबार तिबार मतदान करायला आलेल्या लोकांचा चांगला समाचार घेऊन मग त्यांना पोलिसांच्या हवाली करा.  एकूणच निवडणूक आयोगाविरुद्ध प्रथमच एवढा मोर्चा अन संताप बघायला मिळाला


तुमच्या बुडाला आग लावण्याची हिम्मत आमच्यात आहे.  उद्धव ठाकरे


सदोष मतदारयादी वर निवडणुका होऊ द्यायचा का जनतेने ठरवावे..लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. 

लोकशाहीचा खून होतो आहे. आम्ही आयोगाला प्रश्न विचारतो तर उत्तर कोण देते बघा.  मुख्यमंत्री म्हणजेच आयोगाचे नोकर.  राज्यात निवडणुका घ्यायच्या असेल तर आयोगाने सदोष मतदार यादी द्यावी.

मी तक्रार केली कोणी अर्ज केला,माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न केला आहे.. आपण हा विषय हातात घेतल्यावर माझ्या कुटुंबातील लोकांची नाव बाद करण्यासाठी सुरू आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने verification अर्ज केला आहे..त्यात मोबाईल नंबर खोटा आहे..मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसे भेटायला आली होती. हे विचारायला..हा अर्ज २३ ऑक्टोबर रोजी केला आहे.  मुख्यमंत्र्यांना आवाहन देत आहे आमचा पर्दाफाश करा..दूध के दूध होऊन जाऊ दे..महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो..पक्ष बाजूला ठेवून एकत्र या,मतदारयादीत आपले नाव तपासा. मतचोर जिथे दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा, हे तुम्हाला माहित आहे. 



शरद पवार यांची डागली तोफ.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांनी निवडणूक आयोगावर तोफ डागत चांगलाच समाचार घेतला. आजपर्यंत न घडलेलं आज बघायला मिळते आहे.  आजघडीला आयोगाने उत्तरे द्यायला हवी पण भलतेच लोक उत्तरे देत आहेत. म्हणजेच मतचोरी होतेय!


सत्याच्या मोर्चात मविआ चे नेते सहभागी


व्होटचोरी विरोधात आज महाविकास आघाडीचा मोर्चा मुंबईत झाला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील आजच्या व्होटचोरी विरोधातील मोर्च्यात सहभागी होते.  

ठाकरे बंधू ठरले मोर्चाचे सर्वेसर्वा!

  आजवर ऐकत बघत आलोय.  पण महाराष्ट्रात ठाकरेशिवाय पर्याय नाही. हे आजच्या मोर्चात दिसून आले आहे.  दोन बंधू एकत्र आल्याने सत्ताधाऱ्यांचा पोटशूळ बाहेर आला आहे.  एकूणच "सत्याचा मोर्चा" न भुशो न भविष्यती ठरला आहे.



ठाकरे बंधूंचे जनतेला आवाहन!

 

     कोणत्याही परिस्थितीत सदोष मतदार याद्या जोवर प्राप्त होत नाही. तोवर निवडणुकीला समोर जायचे नाही.  याद्या तपासून खात्री करा. तरच बघू! आणि गावागावात तुम्हीच बघा आणि मतदार याद्या साफ करून त्या पूर्ण केल्यावर जनता ठरवेल.  आता कामाला लागा.  अनेक पुरावे सादर करीत राज ठाकरेंनी केली पोलखोल.


अनोकोंडा कोण? मुख्यमंत्र्यांना आव्हान! उद्धव ठाकरे!


बाप दिल्लीत पोरग चोर गद्दार, राज ने तर पूर्ण पोलखोल केली. बोलतोय कोण तर मुख्यमंत्री. मग मुख्यमंत्र्यांना आव्हान करतोय! तुमच्या मनगटात जर ताकत असेल तर होऊ द्या. दुधाचे दूध अन पाण्याचे पाणी. तुम्ही का बोलताय! म्हणजेच तुम्ही चोरी करून आलेले आहेत हे अप्रत्यक्ष कबूल केले आहे.


प्रतिमोर्चा काढणारा भाजप.

आजघडीला जनतेच्या मनात आहे. ते विरोधी पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढत असतांना भाजपने प्रतिमोर्चा काढला आहे. आता महाराष्ट्र व देशाच्या जनतेनी ठरवायचे काय आहे? प्रश्न निवडणुक आयोगाला विचारल्यावर भाजपचे लोक पुढे का येतात? समजून जा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top