शिवसेना ठाकरे पक्षात जोरदार इमकमिंग,
भालर, नायगाव, बोरगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला भगवा हाती
आ. संजय देरकर यांच्या नेतृत्त्वाकडे युवकांचा कल
वणी - / आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा)पक्षात आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत बुधवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी भालर वसाहत, नायगाव ,बोरगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांने शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षप्रवेश केला आहे. आ. संजय देरकर यांच्या घरी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विजय खेचून आणू असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. Read more
Shiv Sena Thackeray is coming strongly to the party
Read more..
![]() |
| शिवसेना ठाकरे पक्षात जोरदार इमकमिंग |
शिवसेनेचा भगवा फडकणार
शिवसेना (उबाठा) हा केवळ पक्ष नाही तर जनतेचा विश्वास आहे. गावपातळीवर कार्यकर्त्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पष्ट झाले आहे की जनतेला विकास, पारदर्शकता आणि निष्ठेचे नेतृत्व हवे आहे. कार्यकर्त्यांची अशीच साथ मिळाली तर आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा प्रत्येक ठिकाणी फडकणार आहे.
— आ. संजय देरकर, आमदार वणी विधानसभा मतदारसंघ

